नागोठणे पत्रकार संघ आयोजित रांगोळी, किल्ले स्पर्धा बक्षीस समारंभाचे आयोजन

Rangoli
नागोठणे ( महेंद्र माने ) : नागोठणे पत्रकार संघाने दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी, किल्ले स्पर्धेचे निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्याचे बक्षीस समारंभ ग्रामपंचायत श्री शिवगणेश उत्सव सभागृहात शुक्रवार 26 जानेवारी रोजी सायं. 4.30 वाजता मा.जि.प.सदस्य किशोर जैन,सरपंच सुप्रिया महाडीक,मा.सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,उपसरपंच अखलाक पानसरे,भाई साहेब टके, डॉ.आदित्य शिरसाट,विलास देशमुख यांच्यासह संघाचे अध्यक्ष उदय भिसे व सल्लागार राजेश पोवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या बक्षीस समारंभात रांगोळी स्पर्धेचे विजेते – प्रथम क्रमांक- सौ. भक्ति जितेंद्र जाधव नागोठणे, व्दितीय क्रमांक – कु. मानसी कमलाकर राणे,वरवठणे, तृतीय क्रमांक- सौ.सोनम राजेंद्र म्हात्रे,वरवठणे तसेच उत्तेजनार्थ – सौ. तेजेश्री सागर सारले,वरवठणे, कु.मृणाली प्रभाकर धुमाळ,गवळआळी व कु.शीतल रत्नदीप ताडकर, मुरावाडी यांना बक्षीस देण्यात येणार असून किल्ले स्पर्धेचे विजेते- प्रथम क्रमांक- ज्वालाग्रुप खडकआळी,नागोठणे, व्दितीय क्रमांक – कु. वरद मंगेश खंडागळे, तृतीय क्रमांक- कु. यश विनोद पाटील तसेच उत्तेजनार्थ – कु. तन्मय संजय नागोठणेकर व कु. स्वरा सचिन मोरे यांना बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व विजेते स्पर्धकांना पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय दोन्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनाही पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संघाचे सचिव महेंद्र माने व स्पर्धा प्रमुख रोशन पत्की यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *