
पनवेल | प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल-१) परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान नेतृत्वाचे प्रतीक असलेला हा पुतळा विमानतळावरील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे वनमंत्री Ganesh Naik, महिला व बालविकास मंत्री Aditi Sunil Tatkare, आमदार Prashant Thakur, आमदार Mahesh Baldi, माजी खासदार Ramsheth Thakur यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच स्वर्गीय D. B. Patil यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त Rubal Agrawal, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक Shantanu Goel आणि इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
Navi Mumbai International Airport Private Limited (NMIAL) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या स्मारकात ८ फूट उंच चबूतऱ्यावर १२ फूट उंचीचा कांस्य धातूचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. नवी मुंबईतील Aakar Art and Sculpture चे शिल्पकार Nitin Rohidas Gorde यांनी हा पुतळा साकारला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपानुसार कॉपर अॅलॉय ब्राँझमध्ये त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झालेली ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आकर्षण ठरणार आहे. विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची ओळख करून देणारे हे स्मारक महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक म्हणून ओळखले जाईल.
Related