धनाजी घरत पेण एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान

Dhanaji

पेण :

पेण एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्थेची बिनविरोध निवडणूक झाली असून अध्यक्षपदी धनाजी रामभाऊ घरत उपाध्यक्षपदी गौरव सुनित
च- हाटे तर सचिवपदी सुनिल पांडुरंग खेडकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर संचालक म्हणून सौ. अर्चना गोविंद नेमाडे, सौ. सुजाता सुनिल जाधव, संतोष आबा जाधव , सतिश कुमार नारायणराव पवार, भास्कर चिंध्या देशमुख शिवसजन राजाराम कान्हेकर अरूण दत्तात्रय कांबळे यांची बिनविरोध निवड अध्यासी अधिकारी सुभाष काळे यांनी जाहीर केले व सर्वाचे अभिनंदन केले.
अध्यक्षपदी निवड झालेल्या धनाजी घरत यांनी मनोगतात सांगितले की सहाय्यक निबंधक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी चौधरी साहेब व सोनावणे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व संचालक मंडळ पदाधिकारी यांच्या सहकार्याने पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना बरोबर घेऊन आपली पतसंस्था सर्वांच्या हिताचे व योग्य निर्णय घेऊन पतसंस्थेच्या भरभराटीस व नावलौकीकास हातभार लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे सांगितले. शेवटी आभार सचिव सुनिल खेडकर यांनी केले.यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *