
वेळास आगर ( संतोष शिलकर ) :
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हे जागतिक पातळी वरील गेली सतरा,आठरा वर्ष विकसित होत असलेले दिघी पोर्ट हे बंदर NCLT कडून १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अदानी समूहाने दिघी पोर्ट चा ताबा घेतला त्यानंतर ही परिस्थिती जैसे थे अशीच आहे. श्रीवर्धन, मुरूड, म्हसळा, तळा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना आता रोजगार मिळेल उद्या रोजगार मिळेल करत आज इतकी वर्ष तरुण पिढी सुशिक्षित बेरोजगार आज पर्यंत वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत.
या गंभीर विषयाची कोणी विचार करत आहे का ? शिवाय स्थानिक कामगार आहेत त्या कामगारांच्या बाबतीत दुजा भावाची भूमिका मॅनेजमेंट घेत आहे.वारंवार लक्षात आणून देखील मिळणाऱ्या तुटपुंज्या लाभा पासून देखील वंचित ठेवत आहेत.
नुसत्याच पार पडलेल्या चालू आर्थिक वर्षांमध्ये ४०० मिलियन मॅट्रिक टन टारगेट अचीवमेंट केल्या नंतर अदानी समूहा मध्ये काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दोन बेसिक पगार देऊन गौरविण्यात आले,परंतु दिघी पोर्ट मधील हे जुने २००९ पासून काम करणारे श्रीवर्धन, म्हसळा,मुरुड,तालुक्यामधील सर्वच स्थानिक कामगारांना या लाभा पासून वंचित ठेवले जात आहे. कामगारांना व्यवस्थापनाने असंतोष निर्माण करण्याचे वातावरण तयार केले आहे.
मात्र अदानी समूहाच्या दिघी पोर्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारे एक महिना अगोदर रुजू झालेल्या कामगाराला हेतुपुरस्सर दोन बेसिक सन्मान देऊन गौरवण्यात आले.किती हा जाणिव पूर्वक दूजाभाव केला जात आहे.
याबाबतीत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील खासदार मा.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली युनियन नेते संजय वढावकर साहेब जनरल मजदूर सभा युनियनच्या माध्यमातून गेली तीन महिने वारंवार खासदार साहेब यांच्या समक्ष दिघी पोर्ट मधील अदानी पोर्ट व्यवस्थापन,युनियन,आणि युनियनचे कमिटी मेंबर्स यांच्या मध्ये वारंवार बैठका घेऊन सुद्धा हा विषय अद्याप पर्यंत मार्गी लागलेला नाही.
प्रत्येक वेळी खासदार साहेबांनी अदानी समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापकिय प्रतिनिधी सी.एस.राजू तसेच दिघी पोर्ट चे सीईओ कपिल कुमार खंडेलवाल,यांना वारंवार खासदार तटकरे यांनी हा विषय मार्गी लावा अशा सूचना देऊन सुद्धा व्यवस्थापन सूचनेचा अनादर करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या त्यांच्या भूमिके बाबत स्थानिक कामगारांनी संताप व्यक्त करत तीव्र नाराजी दर्शवली जात आहे.या सर्व बाबीचा निषेध म्हणून सर्व कामगार बंधूंनी शांत व संयमाची भूमिका घेत आपापल्या शर्टच्या खिशाला काळी फित लावून जाहीर निषेध नोंदवत आहेत.
व्यवस्थापनाच्या मूजोर भूमिके बद्दल सर्व दिघी पोर्ट चे कामगार वर्गात नाराजीचा सूर उमटत आहेत.जर या गंभीर बाबींचा व्यवस्थापनाने विचार केला नाही तर
काहीच दिवसात तीव्र आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. अदानी समूहाचे नाव मोठे लक्षण खोटे अशी भूमिका दिसत असून अदानी पोर्ट तुपाशी तर स्थानिक कामगार उपाशी
Related