दारु पिवून आपल्या ताब्यातील वाहन चालवू नका, यासाठी वाहन चालक व मालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
पनवेल वाहतूक शाखेचे वपोनि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक व पथकाने आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, नवीन पनवेल उड्डाण पुल परिसर यासह महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी आज जनजागृती अभियान राबवून दुचाकी तसेच चार चाकी वाहनावरील वाहन चालकांना दारु पिवून वाहन चालवू नका, असे आवाहन तसेच वाहन चालकाचे प्रबोधन करण्यात आले.