स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दक्षिण रायगडसह कर्जत तालुक्यात भाजपाला जिल्हा परिषदेत एकही जागा न मिळाल्याने भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज असून हे अपयश दक्षिण रायगड भाजपा अध्यक्ष ,तथा खासदार धैर्यशील पाटील यांचे का ?असा प्रश्न रायगड जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चिला जात आहे.
शेकापामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताच दक्षिण रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष व त्यानंतर राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती झाली मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दक्षिण रायगडमध्ये भाजपाला आलेले अपयश पाहता २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तटकरे निवडणूक लढविणार अशीच स्थिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहण्यास मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर भाजपा अशी युती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होती मात्र स्वबळावर रायगड जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न मात्र दक्षिण रायगड मधून मिळालेल्या अपयशामुळे दूर गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा यांनी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला १५तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६ जागांवर अपेक्षित यश मिळाले भाजपा पेक्षा एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला जिल्हा परिषद अध्यक्ष पद बहाल करून २०२९च्या लोकसभा निवडणुकीची व्ह्यूव रचना राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचे या निमित्ताने पाहण्यास मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५९ जागा आहेत मात्र दक्षिण रायगड सह कर्जत (६), अलिबाग(७), मुरुड (२), रोहा (४), तळा (२), माणगाव (४), म्हसळा (२), श्रीवर्धन (२), महाड (५), पोलादपूर (२), या ३६ जागांवर भाजपाला खाते देखील उघडता आले नाही यातील बहुतांशी जागा या दक्षिण रायगड जिल्हा भाजपा अध्यक्षांच्या अखतारीत येतात मात्र दक्षिण रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष व राज्यसभा खासदार म्हणून धैर्यशील पाटलांची कारकीर्द अपयशी ठरल्याचे चित्र या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
दक्षिण रायगड भाजपा अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर दक्षिण रायगड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला आलेले अपयश हे नक्की कोणामुळे झाले याची आत्मचिंतन करण्याची वेळ भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आता आली आहे सन २०२९ च्या. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खासदारकीची माळ तटकरे यांच्याच गळ्यात पडणार हे यावरून सिद्ध होत आहे.