महाड ( मिलिंद माने ) : दक्षिण रायगड जिल्ह्यात दर रविवारी विविध विभागात पहाटेच्या सुमारास रेड्यांच्या झोंब्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात या झोंब्यांसाठी रायगड जिल्ह्यात सहित अनेक तालुक्यातून तसेच जवळील रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती भागातून मोठ्या प्रमाणावर रेडे झोंबीसाठी आणले जातात या रेड्यांच्या झोंब्यांमधून अनेक रेडे जखमी झाल्याच्या घटना घडत असल्याने दक्षिण रायगड जिल्ह्यातील या रेड्यांच्या अनधिकृत झोंब्या तातडीने थांबवाव्या अन्यथा रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून आत्मदहन करण्याचा इशारा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सादोशी गावातील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
महाड तालुक्यातल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सादोशी गावातील नागरिकांनी रायगड जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनात असे स्पष्ट केले आहे की दक्षिण रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, पोलादपूर या तालुक्यात दर रविवारी पहाटेच्या सुमारास अनधिकृत रित्या रेड्यांच्या झोंब्या आयोजित केल्या जातात. या झोंब्या पाहण्यासाठी आलेले अनेक लोक यापूर्वी देखील जखमी झाले आहेत मात्र जखमी झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे कुठेही वाच्यता करू नये अशी दमबाजी करून धमकी दिली जाते त्यामुळे जखमी झालेले नागरिक या प्रकाराची कुठेही वाच्यता करत नाहीत.
दक्षिण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित केलेल्या रेड्यांच्या झोंब्यांमधून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते तसेच अनेक रेडे या झोंब्यांमधून जखमी होतात मात्र त्यांच्यावर त्या ठिकाणी कोणतेही पशुवैद्यकीय उपचार केले जात नाहीत यामुळे वन्यजीव कायदा अधिनियमाच्या भंग होत असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे या अनधिकृत रित्या होणाऱ्या रेड्यांच्या झोंब्यांना संबंधित गावातील पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे याबाबतची पूर्वकल्पना देण्याचे काम संबंधित गावातील पोलीस पाटील यांच् असताना पोलीस पाटील या अनधिकृत रेड्यांच्या झोंब्यांना उलटे समर्थन देण्याचे काम करीत आहेत.
दक्षिण रायगड जिल्ह्यातील या रविवारी होणाऱ्या रेड्यांच्या झोंब्या तातडीने आपण थांबवाव्या व अशा प्राण्यांच्या बेकायदेशीर रित्या झोंब्यांमधून पाळीव प्राण्यांचे अमानुष्. छळ करणाऱ्या रेड्यांच्या मालकासहित रेड्यांच्या झोंबी आयोजित करणाऱ्या व संबंधित पोलीस पाटलांच्या विरोधात आपण कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाड तालुक्यातल्या शांदोशी गावातील नागरिकांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक ,रायगड जिल्हाधिकारी ,तसेच महाडचे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत),. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी ,महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक. यांना याबाबतचे लेखी निवेदन सादर केले आहे याबाबत संबंधित यंत्रणेने तातडीने दखल न घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.
पोलिसांची दुटप्पी भूमिका?
महाड तालुक्यात दर रविवारी रेड्यांच्या अनधिकृत झोंब्या मोठ्या प्रमाणावर चालतात याची पूर्वकल्पना महाड शहर ,महाड तालुका पोलीस ठाणे, महाड एमआयडीसी पोलीस ठाणे. या सहित जवळील माणगाव व पोलादपूर तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना यांची पूर्वकल्पना असताना आज पर्यंत अशा एकाही अनधिकृत रेड्यांच्या झोंब्या आयोजित करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस यंत्रणेने दाखवलेले नाही मात्र महाड तालुका पोलीस पाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी सी आर पी सी कलम 149 प्रमाणे 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सादोशी गावातील सुनील विलास कोरपे राहणार नेराव तालुका महाड जिल्हा रायगड यांना अशा अनधिकृत रेड्यांच्या झोंब्या आपल्या गावात चालू करू नये अशी नोटीस महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रकाश माने यांनी दिली होती.
या नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आले होते की आपण किंवा आपल्या हस्तकान करूवी असे कोणतेही कृत्य करू नये जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच आपल्या कृतीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यास अगर गुन्ह्याचे कृत्य घडल्यास या नोटीशीचा भंग केला म्हणून आपणा विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे या प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस देण्यात आली होती.
जर एखाद्या गावात एकाच व्यक्तीला रेड्यांच्या अनधिकृत झोंब्या आयोजित करण्याबाबत नोटीस देण्यात आल्या तर यापूर्वी महाड तालुक्यात विन्हेरे, शिरवली ,तुढील, , सावरट हे महाड तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही गावे येत असताना देखील महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रकाश मायने यांनी व महाड एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी गावात झालेल्या अनधिकृत रेड्यांच्या झोंब्यांबाबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी संबंधितांना नोटीस का बजावली नाही असा सवाल महाड तालुक्यातील नागरिक जिल्हा पोलीस अधीक्षक व रायगड जिल्हाधिकारी यांना विचारत आहेत
एकंदरीत अनधिकृत रेड्यांच्या झोंब्यांबाबत पोलीस कोणती भूमिका घेतात यावरच सादोशी गावातील नागरिकांची भूमिका ठरणार आहे.