तामसोली-सावरट येथे बाळगोपाळ फाउंडेशन खार ( मुंबई) यांचा वचनपुर्ती सोहळा उत्साहात साजरा

Balgopal Foundation
सुकेळी ( दिनेश ठमके) :
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या रा.जि.प.शाळा तामसोली- सावरट येथे शनि. ( दि.२२) रोजी बाळगोपाळ फाउंडेशन खार ( मुंबई) यांच्या वतिने शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी वचनपुर्ती सोहळा अतिशय उत्साह व आनंददायी वातावरणात पार पडला.
यावेळी बाळगोपाळ फाउंडेशन खार ( मुंबई) यांच्या वतिने तामसोली व आजूबाजूच्या परिसरातील एकुण पाच शाळांचा सर्वे करुन रा.जि.प.शाळा तामसोली , घोगरकरवाडी, व मांडवशेत या तीन शाळांचे रंगकाम करणे, लादी बसवणे, वायरिंग करणे , शाळेसाठी पंखे देण्याचे काम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. तसेच याच परिसरातील वेताळवाडी, गणपतवाडी, तामसोली, व घोगरकरवाडी या सर्व शाळांतील एकुण ८२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप खेळाचे साहित्य, खाऊ वाटप तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना साडी वाटप करुन या बाळगोपाळ फाउंडेशने दिलेल्या वचनांची पूर्तता केली आहे. त्यामुळे या फाउंडेशनचे विभागातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
या कार्यक्रमाला बाळ गोपाळ फाउंडेशनचे अध्यक्ष सखाराम वायगणकर, सदस्य किशोर पाडावे, नितीन खांबल, सचिन पाटील, विकास तेजम, संदिप जाधव, शशिकांत तर्फे, पांडुरंग बागकर, अरुण दणदणे, प्रमोद पेडणेकर, सचिन टेमकर, विनोद धुरीया, मनोज शिरसे, ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अर्चना भोसले, सदस्य प्रकाश डोबळे, शाळा कमिटी अध्यक्ष विजय शिरसे, तामसोली गाव अध्यक्ष उमाजी चव्हाण, ह.भ.प.नानाजी महाराज शिरसे, परशुराम शिरसे, पोलिस पाटील ह. भ.प. महेश शिरसे, रविंद्र यादव, सचिन भोसले, प्रफुल्ल कणघरे, राजेश भिल्लारे, मंगेश कणघरे, यांच्यासह पाचही शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण म्हात्रे सर व पांडुरंग बागकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *