तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायत तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नीलिमा पाटील, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, नगरसेविका ज्योती म्हात्रे, शर्मिला पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा म्हात्रे ,खारपाडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रश्मी भगत, गडब काराव ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, तनवी पाटील तसेच डोलवी येथील महिला कीर्तनकार भगीरथी ताई पाटील या उपस्थित होत्या.
डोलवी ग्रामपंचायतमध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त ग्राम पंचायत समितीतर्फे महिला व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलेल होते. याबद्दल निलिमा पाटील यांनी सरपंच परशुराम म्हात्रे, उपसरपंच रोहन म्हात्रे, व सर्व सदस्य यांचे विशेष आभार मानले. तसेच यापूर्वी सावित्रीबाईंनी घेतलेल्या पुढाकारामुळेच महिला सर्वच क्षेत्रात मग ते शिक्षण असो वा राजकीय त्या सर्व क्षेत्रात महिला या आघाडीवरच आहेत याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते असे नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले.
तसेच महिलांना बचत करून कुटुंब सांभाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तर डॉक्टर मनीषा म्हात्रे यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. शर्मिला पाटील यांनी सर्व महिलांना शुभेच्छा धन्यवाद दिले. भागीरथी पाटील यांनी वीर जिजामाता, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मोलाची मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी ही याना तसेच आदिवासी समाजातील महिला विविध मोलाची कामगिरी करत असल्याचे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक्षा म्हात्रे, आरती मात्रे, पूजा मात्रे , मनस्वीनी पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी सरपंच परशुराम म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.