डॉ. अवनी डोईफोडे यांना प्रतिष्ठित पियरे फौचार्ड अकादमी पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) स्टुडंट मेरिट अवॉर्डने सन्मानित

Aavani
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील रमेश डोईफोडे (प्रमोद पॅथॉलॉजी लॅब, ध्रुव हॉस्पिटल) यांची कन्या डॉ. अवनी डोईफोडे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित “पियरे फौचर्ड अकादमी (पी एफ ए) पीजी स्टुडंट मेरिट अवॉर्ड” नी सन्मानित करण्यात आले आहे. 
हा पुरस्कार ६ डिसेंबर रोजी दिल्लीतील गाझियाबाद येथील फॉर्च्युन डिस्ट्रिक्ट सेंटर, हॉटेलमध्ये आयोजित पी एफ ए कॉन्फरन्स, दीक्षांत समारंभ आणि पुरस्कार समारंभात प्रदान करण्यात आला.
डॉ. अवनी यांनी नुकतेच “शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर” येथून MDS (बाळदंतरोगशस्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केली असून, त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकिर्दीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या गौरवशाली प्रवासात आठ कॉपीराइट्स, नऊ संशोधन प्रकाशने आणि आठ “सर्वोत्कृष्ट रिसर्च पेपर” पुरस्कारांचा समावेश आहे.
पीएफए ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध संस्था आहे. जी उत्कृष्ट योगदानासाठी आणि नोबल प्रोफेशनच्या उन्नतीसाठी मानद फेलोशिप आणि पुरस्कार प्रदान करते, डॉ. अवनी यांना अनुकरणीय योगदानाबद्दल आणि पदव्युत्तर विद्यार्थिनी म्हणून अपवादात्मक गुणवत्तेबद्दल सन्मानित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *