जिल्ह्यातील सर्व शिक्षक सेवकांचे प्रलंबित कामं, प्रश्न मार्गी लावणार – लेखाधिकारी शिवदास पोटे

School Audit
पोलादपूर (शैलेश पालकर) :
रायगड जिल्ह्यातील गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारे शाळांचे ऑॅडिट यासह भविष्य निर्वाह निधी स्लीपा बाबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र, लेखाधिकारी शिवदास पोटे यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अलिबाग कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ जिल्ह्यातील शिक्षक सेवकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक तालुक्यात कॅम्प घेत शाळांची ऑॅडिट व भविष्य निर्वाह निधीचा हिशोब कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले.
 याअनुषंगाने पोलादपूर येथे लेखापरीक्षण शिबिर आयोजित करून शाळांची ऑॅडिट व भविष्य निर्वाह निधी च्या स्लिपा कर्मचाऱ्यांना देण्याबाबत शिबिर आयोजित करण्यात आले. या लेखापरीक्षण टीममध्ये लेखाधिकारी तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अलिबागचे अधीक्षक शिवदास पोटे, सहाय्यक लेखाधिकारी वायळ ,सहाय्यक लेखाधिकारी थवई मॅडम, वरिष्ठ लिपिक संतोषकुमार लाड, कनिष्ठ लिपिक नीलमवार, श्रीमती चाळके, माळी आदी उपस्थित होते. यावेळी पोलादपूर तालुक्यातील धारवलीचे डॉ.आशिष जैतपाल लिखित विचार विमर्ष पुस्तक भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी विद्यामंदिराचे प्राचार्य रवींद्र साळुंखे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, लेखनिक या शिबिरासाठी उपस्थित होते. लेखाधिकारी शिवदास पोटे यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अशा पल्लवी झाले असून शाळा संस्था व कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *