जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी पोलादपूरमध्ये गुन्हा दाखल

Fir

पोलादपूर ( शैलेश पालकर ) :

तालुक्यातील काळकाई ढाबा हॉटेल येथे 24 मे 2024 रोजी रात्री 11 वाजता घडलेल्या घटनेमध्ये जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी आणि फिर्यादी दोघे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असून 2 जून 2024 रोजी घटनेबाबत अर्ज प्राप्त झाला. यानंतर पोलीस ठाण्याची सीसीएनएस प्रणाली सुरू झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सव्वासात वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
काळकाई ढाबा हॉटेल येथे 24 मे 2024 रोजी रात्री 11 वाजता घडलेल्या घटनेमध्ये फिर्यादी मिलींद सुनील साबळे (रा.वालचंदनगर, ता.इंदापूर, जि.पुणे) यास तो कोणत्या समाजाचा आहे, हे माहिती असूनही जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी संदीप उर्फ बाबू पवार (रा.बारामती, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान आरोपीने फिर्यादीला हाताबुक्क्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली व महापुरूषांच्याबाबत अपशब्द वापरून भावना दुखावल्याने पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हयाची रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली.
काळकाई ढाबा हॉटेल येथे 24 मे 2024 रोजी रात्री 11 वाजता घडलेल्या घटनेचा अर्ज 2 जून 2024 रोजी घटनेबाबत अर्ज प्राप्त झाला. चौकशीअंती 12 ऑगस्ट रोजी घटनेबाबत गुन्ह्याची खबर घेण्यात आली. मात्र, पोलीस ठाण्याची सीसीएनएस प्रणाली 11 ऑगस्टपासूनच बंद असल्याने गुन्हा दाखल करण्यास तांत्रिक कारणावरून विलंब झाला. सीसीएनएस प्रणाली पूर्ववत सुरू झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सव्वासात वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांनी तपास करून मार्गदर्शन केले.
याप्रकरणी भारतीय दंड संहिता आणि अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपी संदीप उर्फ बाबू पवार याच्याविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 73-2024 गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे हे तपासिक अंमलदार म्हणून काम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *