जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दी लाईफ फाऊंडेशन तर्फे गुरुवार दि.२० जून रोजी अलिबाग तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राजिप प्राथमिक शाळा वरसोली येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी दी लाईफ फाऊंडेशनकडून योग प्रशिक्षक संसाधन व्यक्ती म्हणून कैवल्यधाम लोणावळा येथून शिवांजली पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या शिबिराचा मुख्य उद्देश अंगणवाडी सेविकांना योग प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून अंगणवाडीतील बालकांना तसेच त्यांच्या मातांना योग प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. या योग प्रशिक्षणात सर्व महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योग साधनेचे महत्व पटवून देत त्यांना विविध योगासने शिकवण्यात आली.
या शिबिरावेळी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, पर्यवेक्षिका सामिया पेरेकर तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.
हे योग प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, मुस्कान शेख, सोशल वर्कर मनस्वी थळकर यांनी मेहनत घेतली.