जरांगे यांच्या पायी वारीसाठी रायगड जिल्ह्यातून दहा लाख भाकरीचे नियोजन !

Karjat Maratha
कर्जत ( गणेश पवार ) : अंतरवाली येथुन निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पायी यात्रा 25 जानेवारी रोजी सकाळी लोणावळा येथून पनवेल दिशेने निघणार आहे. पनवेल येथे दुपारी अंदाजे दहा लाख बांधवांचे दुपारचे जेवण व्यवस्था रायगड जिल्ह्याकडे असल्याने जिल्हाभर तालुका तालुक्यात नियोजन सुरू आहे.
कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात सदर बैठक पार पडली. या बैठकीस राज्य समन्वयक विनोद साबळे आणि सुनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कर्जत मधील शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातून एक लाख भाकरी देण्याची जबाबदारी तालुका समन्वयक यांनी घेतली असून गावागावातून भाकरी जमा करणार असल्याचे समन्वयक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *