चोंढी येथे १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर

Chondhi
अलिबाग/सोगांव (अब्दुल सोगावकर ) :
चोंढी येथे संस्कृती केंद्र व सक्षम एज्युकेशन सोसायटी, किहीम यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रिती गायकवाड यांच्या पुढाकाराने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर १०वी आणि १२वी शिकणाऱ्या आणि तसेच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चोंढी येथील राजिप शाळेत आयोजित केले होते.
शिबिरात प्रमुख वक्ते व समुपदेशक म्हणून सक्षम एज्युकेशन सोसायटीचे शार्दूल विजय काठे, योगेश पवार, परेश सुर्वे, शुभांगी कुलकर्णी या मान्यवरांनी उपस्थितांना सोप्या भाषेत करिअर निवडीबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी सध्याची किशोरवयीन मुले, मोबाईलचे फायदे व तोटे, योग्य भविष्यकालीन व्यावसायिक शिक्षणाची निवड व संधी, ध्येय निश्चिती, ध्येय प्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न, विद्यार्थी सर्वांगीण विकास यासारख्या महत्वपुर्ण विषयांवर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
या करिअर मार्गदर्शन शिबिराला चोंढी परिसरातील विद्यार्थी संबंधित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रसन्न ठाकूर यांनी केले, तर प्रिती गायकवाड व संपदा पोंगाडे यांनी सर्वांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *