चिल्हे येथील लोखंडे भावकीच्या कुलदैवताचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा

Lokhande Bhaavaki
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील आध्यात्मिक तथा धार्मिक परंपरेचा वारसा तसेच संत परंपरा लाभलेल्या मौजे चिल्हे येथे लोखंडे भावकीच्या कुलदैवताचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात धार्मिक तथा आध्यात्मिक व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
सदरच्या या कार्यक्रमानिमित्ताने कुदैवतावर दुग्ध जलाभिषेक,सत्यनारायण महापूजा, प्रवचन,श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी हरिपाठ, तद्नंतर हरीकीर्तन,भजन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी लोखंडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते.
स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाल बाबा वाजे, धोंडे बाबा कोल्हटकर,यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खांब पंचक्रोशी तसेच पंचक्रोशीचे मूळ मार्गदर्शक लोखंडे परिवाराचे प्रेरणास्थ वैकुंठवासी नारायण महाराज लोखंडे यांच्या कृपाछत्राखाली चालत आलेला या उत्सव सोहळ्यानिमित्ताने प्रसंगी यावेळी हभप सुधीर महाराज लोखंडे चिल्हे यांची प्रवचन सेवा तर हभप राम महाराज सावंत मुठवली खुर्द यांची कीर्तनरूपी या ठिकाणी संपन्न झाली.
तर या धार्मिक तथा आध्यात्मिक लोखंडे भावकीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खांब पंचक्रोशीचे वैभव गुरुवर्य डॉ. मारुती महाराज कोल्हटकर, खांब पंचक्रोशीचे उपाध्यक्ष हभप प्रकाश महाराज थिटे, ज्येष्ठ वारकरी मोरेश्वर महाराज मरवडे, विनेकरी देवजी महाराज मरवडे,खेळू मरवडे, रघुनाथ कोस्तेकर, मारुती खांडेकर सर,दिलीप मोहिते, युवा सामाजिक कार्यकर्ते सुनिल महाडिक, तसेच परिसरातील वारकरी संप्रदायाचे भक्त गण, सामाजिक शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर चिल्हे ग्रामस्थ व महिला मातांनी लोखंडे परिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व सदिच्या देत कार्यक्रमाचा लाभ घेतला.
तर आयोजित या कार्यक्रमात हभप राम महाराज सावंत यांनी कुळीची हे कुळदेवी । केली ठावी संतांनी ॥१॥बरवे जाले शरण गेलो । उगवलो संकटी ॥ध्रु.॥आणिला ही रूपा बळें । करूनि खळें हरीदासीं ॥२॥तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून आमच्या कुळातील कुळदेवी संतांनी आम्हाला माहीत करून दिली. बरे झाले मी त्यामुळे देवीला शरण गेलो त्यामुळे माझी सर्व संकटे नाहीशी झाली आहे. मोठ्या भक्तीच्या बळावर या संतांनीं देवीला नावारूपाला आणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात संत संगतीनेच मी त्या कुळदेवी पुढे नाचु लागलो असे सांगत पहिले कुलदैत, ग्रामदैवत, आणि उपासक, यांच्यामुळे कुटुंब सुखावतो तसेच ज्ञान, विज्ञान आणि मार्ग असे मोलाचे विवेचन करत उपस्थित संप्रदाय मंडळी यांना मंत्रमुघ केले.
तर धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण लोखंडे परिवार आणि भावकीने अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *