चाकूचा धाक दाखवत 19 वर्षीय विवाहितेवर बलात्कार

Rape
नागोठणे (महेंद्र माने) :
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसई येथील चाळीतील फिर्यादीच्या राहत्या खोलीत शनिवार 22 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पीडित 19 वर्षीय परप्रांतीय विवाहित तरुणीवर चाकूचा धाक दाखवीत बलात्कार करण्यात आला. गुन्हा दाखल होताच बलात्कारी परप्रांतीय आरोपीस तीन तासाच्या आत पळून जाण्याच्या तयारीत असताना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. स.पो.नि.सचिन कुलकर्णी यांनी वेगात सूत्रे फिरवून केलेल्या कामगिरीचे नागोठणे शहर व विभागातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी पीडित 19 वर्षीय परप्रांतीय विवाहित तरुणी व आरोपी हे नात्यातील असून फिर्यादीचे पती व आरोपी हे एकाच कंपनीत कामाला आहेत. पीडितीचे पती घरात नसल्याचा फायदा घेत आरोपी याने शनिवार 22 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पीडितीच्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारिरीक संबंध करण्यास भाग पाडले. व झालेला प्रकार कोणाला सांगीतल्यास तुला व तुझे पतीला ठार मारेन अशी धमकी दिली.घाबरलेल्या पीडितेने 25 मार्च रोजी झालेला प्रकाराची कल्पना आपल्या पतीला देताच त्यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात धाव घेतली.
वेगवान तपासासाठी दोन पथके रवाना –
सदरील माहिती पो.नि.सचिन कुलकर्णी यांना मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून तपास आपल्याकडे घेत गुन्हा दाखल केला. व वेगवान तपासासाठी दोन पथके स्थापन करून तपास कार्यास रवाना केली.
पेण रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपी ताब्यात –
आरोपी हा मध्यप्रदेश येथील असल्याने तो पळून जाण्याच्या बेतात असणार म्हणून त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारावर वडखळ ते पेण दरम्यान पाठलाग करीत पेण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करून पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुंहयाची कबुली दिल्याने अटक करण्यात आली.
या पथकांनी केली साहसी कामगिरी –
 नागोठणे पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलिस हवालदार संतोष म्हात्रे, अशोक म्हात्रे व चंद्रशेखर नागावकर,पो.शि. स्वप्नील भालेराव,चालक मिलिंद महाडीक या पथकांनी साहसी कामगिरी केली.
आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी—
सदरील आरोपीस बुधवार 26 मार्च रोजी रोहा येथील न्यायालयात हजर केले असता ; त्याला पुढील तपासासाठी 29 मार्च पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस तीन तासाच्या आत मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन केलेल्या साहसी कामगिरीबद्दल स.पो.नि.सचिन कुलकर्णी व त्यांच्या पथकाचे नागोठणे शहर व विभागातून अभिनंदन व कौतुक होत असून सदरील घटनेची नागोठणे पोलिस ठाण्यात गू.र.नं. 33/25 भा.न्या.सं.2023 चे कलम 64,351 (2 व 3) अशी गुन्हा झाली असून पुढील तपास सहा.पो. नि. सचिन कुलकर्णी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *