रायगड जिल्ह्यातील भाले बौद्धवाडी येथे रुपेश गोविंद जाधव व रामदास गोविंद जाधव (दोघेही राहणार – भाले बौद्धवाडी, निजामपूर तालुका माणगाव) यांनी घरात घुसून पांडुरंग रामभाऊ यादव यांना मारहाण केल्याप्रकरणी पांडुरंग रामभाऊ यादव माणगांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माणगाव तालुक्यातील भाले बौध्दवाडी येथे पांडुरंग रामभाऊ यादव यांचे राहते घरी हे त्यांचे राहते घरी झोपलेले असताना रुपेश गोविंद जाधव व रामदास गोविंद जाधव यांनी संगणमत करुन पांडुरंग रामभाऊ यादव राहते घरात घुसुन पांडुरंग रामभाऊ यादव काठीने मारहाण करुन त्याचे डोक्याला व उजव्या पायाचे नडगिला दुखापत केली व हाताबुक्यानी मारहाण व शिवीगाळ करुन मारुन टाकतो अशी धमकी दिली.
याबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं.122/2024 भा.दं.वि.क.452,324,323, 504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार किरण तुणतुणे हे करीत आहेत.