गोडाऊनच्या गेटमधून प्रवेश करून गोडाऊनचा कोयंडा तोडून गोडाऊन मधील 26 लाख 57 हजार 36 रुपयांच्या स्टेनलेस स्टील चोरी केल्याप्रकरणी अनोळखी ईसमाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महेंद्र अंगारा यांचे मुंबई येथे स्टेननेस स्टीलचे होलसेल व्यापाराचे कार्यालय आहे. त्यांनी कळंबोली येथे गोडाऊन घेऊन त्यात स्टेनलेस स्टीलचा माल साठवणूक करून ठेवतात. यांच्या गोडाऊन मध्ये चोरी झाल्याचे काम करणाऱ्या कामगारांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या गोडाऊनमध्ये दोन ते तीन इसमांनी गेटचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि त्यांच्याकडील टेम्पोमध्ये स्टेनलेस स्टील कॉइल सामान भरून घेऊन ते निघून गेले. एकूण 26 लाख 57 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेल्या प्रकरणी अनोळखी ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.