पेण : पेण एज्युकेशन सोसायटीच्या नऊ शाळांपैकी सर्वात लहान शाळा वावोशी येथील नाना टिळक प्राथमिक विद्यालय ही आहे. खर पाहिले तर शाळा लहान असली तरी शाळेची किर्ती महान असून आदर्श व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावलौकीक मिळवला असल्याने संस्थेला त्याचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोदगार पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड मंगेश नेने यांनी वावोशी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना केले.
पेण एज्युकेशन सोसायटीची श्री द.पां.तथा नाना टिळक प्राथमिक विद्यालय वावोशी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड मंगेश नेने(पेण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष) प्रमुख पाहुणे युवा उद्योजक सुजितकुमार पिंगळे, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष वसंत आठवले, विद्यमान कार्याध्यक्ष प्रशांत ओक,
प्रशासकीय अधिकारी चिंचणीकर, स्विकृत सदस्या डॉ निता कदम, हेमा राजे गोरठणचे, माजी सरपंच गिरीधर पिंगळे गुरूजी, वावोशी ग्रा.पं. उपसरपंच दिपा शिर्के, ग्रा.सदस्या पूनम भऊड, रिया वालम, गोविंद वालम, भानू जोशी, के. आर. पाटील, सायली पिंगळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा हेमांगी बामुगडे, संगीता पाटील, माजी केंद्रप्रमुख मनोहर म्हात्रे, मुख्याध्यापिका विद्या धनाजी घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली दिप प्रज्वलन करून श्रीफळ फोडण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विद्या घरत यांनी करून शाळेच्या वर्षभरातील प्रगतीचा अहवाल सादर केला. विविध स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
———————————-
प्रमुख पाहुणे सुजितकुमार पिंगळे यांनी शाळेचा दर्जा उत्तम असून माझ्या दोनही मुली याच शाळेत शिकून शिक्षण पूर्ण केल्याचा व मला पालक म्हणून प्रमुख पाहुणे बोलावले याचा मला अभिमान असून पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून लांब ठेवावे व तसेच मुलांना योग्य संस्कार देऊन आपल्या शाळेच्या नावलौकीकास भर घालावी असे सांगितले.
———————————–
यावेळी अँड मंगेश नेने विद्या घरत व मानसी केदारे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन शालेय विद्यार्थीनी प्रांजल बोर्डेकर व जान्हवी सावंत व मानसी केदारे तर आभार संकीर्णा पाटील या मुलीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या शेट्ये रंजना भऊड सुलभा राजपूरकर सुनिल पवार दर्शना यादव आदीनी विशेष मेहनत घेतली .