खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित पळस विभागात विविध कार्यक्रम

Palas karyakarte
नागोठणे (महेंद्र माने) :
राष्ट्रवादी कॉग्रेसचे पेण सुधागड मतदार संघाचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे (दिशा समिती) सदस्य शिवराम शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच पळस ग्रुप ग्रामपंचायत व पळस विभागीय रा.कॉ.च्या वतीने बुधवार 09 जुलै रोजी पळस येथे रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पळस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवराम शिंदे, सरपंच सुप्रिया डाकी माळी,उपसरपंच श्री चंद्रकांत भालेकर यांच्या उपस्थितीत रा.जि.प. शाळा पळस येथील मुलांना खाऊ वाटप,विभागातील वयोवृद्ध नागरिकांचा सत्कार,विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच घरकुल योजनेच्या माध्यमातून 24 लाभार्थीना 05 ब्रास वाळूचे पास वाटप करण्यात आले.
यावेळी शिवराम शिंदे यांनी खा.सुनील तटकरे यांनी आजपर्यंत लोकहिताची केलेल्या कार्याची माहिती देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्यासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली. सदरील कार्यक्रमाला माजी सरपंच निष्ठा विचारे,माजी सरपंच हिराजी शिंदे, माजी सरपंच मारुती शिर्के यांच्यासह ग्रा.पं.सदस्य यतीश डाकी यांच्यासह ग्रामसेवक कांचन राऊत, तलाठी कुलकर्णी, संतोष वाघमारे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *