खासदार सुनील तटकरे व वरदा तटकरे यांचा कर्जत येथे भव्य नागरी सत्कार

Sunil tatkare karjat sanman
कर्जत (गणेश पवार) : 
कर्जत येथील पोलीस ग्राउंडवर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार सुनील तटकरे व वरदा तटकरे यांचा ‘भारतभूषण’ जागतिक सन्मानप्राप्तीनिमित्त भव्य नागरी सत्कार पार पडला. या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात तटकरे दाम्पत्यांना शाल, पुणेरी पगडी व विठ्ठल-रखुमाईची चांदीची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी प्रफुल्ल पटेल यांनी तटकरे यांच्या कार्याचा गौरव करताना, “जातपात न पाहता केलेल्या कामांनी तटकरे मोठे झाले आहेत. ते संसदेत आपले नेतृत्व करीत आहेत. सुधाकर घारे यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही; पण जनता त्यांच्या पाठीशी आहे,” असे मत व्यक्त केले. यावेळी शिंदे गटातील खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, अश्विनी पाटील, माजी उपनगराध्यक्ष राहुल जाधव, अनिता शहा, जेबुनिता शेख आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
सत्कार स्विकारताना सुनील तटकरे म्हणाले, “संधी मिळाल्यास मी नेहमी लोकांसाठी काम केले आहे. कर्जत मतदारसंघातील तीनही नगरपरिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवावा हाच माझा खरा सत्कार असेल. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाने कर्जत रेल्वे स्थानकाचे नामांतर व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *