खांब -देवकान्हे विभागात बाळ गोपाळांच्या गजरात गोविंदा उत्सव

Khamb Dahi Handi1

कोलाड ( श्याम लोखंडे ) :

रायगड रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागात भारतीय संस्कृती तथा धार्मिक उत्सव म्हणजेच दहीहंडी गोविंदा उत्सव हा बाळ गोपाळांच्या गजरात मोठ्या उत्साह वातावरणात व आनंदात साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृती परंपरा सर्वत्र परंपरागत चालत आलेला गोविंदा उत्सव हा बालगोपाळांच्या गजरात गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला,नामाचा जय घोष करीत आनंदात कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत खांब देवकान्हे विभातील खांब, पुगाव, गोवे, मुठवली, शिरवली, नडवली, तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे,बाहे,देवकान्हे,सह अन्य आदिवासी वाड्यांवर श्रीकृष्ण जन्मष्टमी व दहीहंडी खाजगी आणि सार्वजनिक हंडी फोडून गोविंदा उत्सव मोट्या आनंदात साजरा करण्यात आला.
 गोविंदा पथकांनी थरावर थर लावत सलामी देत उत्सव साजरा केला तर चिमुकल्या मुलींनी देखील तीन चार थर लावून हंडी फोडून हा उत्सव साजरा केला तसेच काही ठिकाणी परंपरेने चालत आलेल्या भंडारी नाच गाण्यांच्या व खालू बाजाच्या गजरात हा उत्सव साजरा करत या ठिकाणी युवकांच्या मदतीने जेष्ठ नागरिकांनी गोविंदाचे थर लावून हंडी फोडून मोठया आनंदाने साजरा केला.
Khamb Dahi Handi
खांब देवकान्हे विभागातील युवक मंडलानी या ठिकाणी हा उत्सव आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानी तर काही ठिकाणी हॉलीबॉल स्पर्धा खेळ खेळत साजरा करत केला तर कार्यक्रमाच्या सुरवातीलाच जन्म अष्टमी निमित्ताने चिल्हे, देवकान्हे, धानकान्हे,बाहे, मुठवली, येथे स्वाध्याय परिवाराचे प्रणते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले प्रेणीत युवकांनी पथनाट्य सादर करत ग्रामस्थांना मंत्र मुग्ध केले तसेच सीमेवरील हल्ल्यात शाहिद झालेले जवान, सामजिक शैक्षणीक राजकीय तसेच गावातील गेली वर्षभरात देवअज्ञा झालेल्या व्यक्तींना गोविंदास्थळी श्रद्धांजली अर्पण करून गोविंदा साखळी पद्धतीने व मोठ्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला.तर दहीहंडी उत्सवात गुलाब फुलांनी व फळांनी सजवलेल्या हंडी फोडण्याचा आनंद येथील बालगोपाळ युवक व ग्रामस्थांनी लुटला.
तसेच या विभागातील काही गोविंदा पथक ग्रामस्थ युवक आपले गोविंदा पथक गावातील गोविंदा उत्सव साजरा करुन जिल्ह्यात विविध ठिकाणच्या नामांकित हंडीला सलामिसाठी तसेच सार्वजनिक हंडी उत्सवात सहभागी झाले होते.तर सकाळपासूनच रिमझिम पाऊस आणि ऊन सुरू असताना देखील येथील लहान थोर बाल गोपलानी गोविंदा उत्सवाचा आनंद लुटला.तसेच या विभागतील काही ग्रामस्थ गोविंदा पथकांनी आपआपल्या गावातील दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात वेळेत साजरा करत जिल्ह्यात विविध ठिकाणच्या आयोजीत करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात पारितोषिक मिळविण्यासाठी तसेच आपल्या पथकाचे नाव लौकिक करण्यासाठी सहभागी झालेचे पाहवयास मिळत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *