रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागात सोमवारी १४ सप्टेंबर रोजी बाप्पांच्या आगमना पासून गावागावात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दिड दिवसांच्या बाप्पांना ढोल, ताशांच्या व खालू बाजा आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, उंदीर मामा की जय म्हणत येथील लहान थोर मंडळी भक्तगणांनी आपल्या लाडक्या आवडत्या बाप्पाला मोठया भक्तिमय वातावरणात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी निरोप दिला.यावेळी गावातील लहान थोर तसेच महीला भगिनी यांनी विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी करत सर्वाना सुखी ठेव म्हणत भक्तीमय वातावरणात निरोप दिला.
गणपती विसर्जनासाठी आठ दहा दिवसांपूर्वीच येथिल ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गणरायांचे आगमन होणार असल्याने गावातील व विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तर विशेष वीसर्जन घाटांची आणि ते मार्ग गाव ठिकाणी ग्रामस्थ नागरिकांनी तर काही ठीक ठिकाणी श्री सदस्यांकडून स्वच्छता करण्यात आली होती.तर गणपती उत्सव प्रथमदिनी लहान थोर ग्रामस्थ नागरीक माता भगिनींनी भजन, नाच गाण्यांचा आनंद लुटला मंगळवारी सायंकाळी वाजत गाजत, काहीतर गुलाल उधळत, टाळ मॄदुंग, ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती. एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नजिकच्या तलाव ठिकाणी निघाले होते.तर पावसाच्या विश्रांतीत बाप्पाला मोठ्या उत्साहात आणि आनंदाने भक्तीमय वातावरणात निरोप दिला.
भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय असे गजर करीत तलावात तर काही ठिकाणी नदीवर भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले तद्नंतर गड्यांनो हळू हळू चला, वाचे गजानंद बोला असे भजन गात पुन्हा घरी परतले.