को.ए.सो च्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलनातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मंगळवार 04 फेब्रुवारी प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. संदेश गुरव, प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. मनोहर शिरसाठ, डॉ. राणी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. आक्रोश पाटील सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने नियमित कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 35 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिरात अलिबाग येथील जिल्हा रक्तपेढीचे व त्यांच्या सहकार्यांनी रक्त संकलन केले.
सदरील शिबीर यशस्वीपणे पडण्यासाठी प्राचार्य डॉ. दिनेश भगत,कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. मनोहर शिरसाठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख डॉ. राणी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील साहिल घरत, सानिका घासे,सुमित घासे, भार्गव, तेजल डाकी, श्रुती बोरकर, प्रतिक्षा या विद्यार्थ्यांनी हे अपार मेहनत घेतली.