महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले असून कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 15 विधानसभा जागांपैकी सात विधानसभा मतदारसंघावर व्ह्यू रचना तयार केली असून महाराष्ट्रात 288 पैकी 200 ते 225 जागा मनसे स्वबळावर लढण्याची तयारी केल्याची मनसेचे कोकणचे सरचिटणीस मुखेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.
राज्यात लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता मात्र आता त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे व त्या पद्धतीने व्ह्यू रचना तयार झाली असल्याचे कोकणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आज जाहीर केले.
कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात विधानसभेच्या 15 जागा येतात त्यापैकी सर्वाधिक जागा या रायगड जिल्ह्यात आहेत त्यातील पनवेल -प्रशांत ठाकूर (भाजपा) , कर्जत- महेंद्र थोरवे शिवसेना( शिंदे गट), उरण -महेश बालदी (भाजपा पुरस्कृत अपक्ष), पेण -रवीशेठ पाटील (भाजपा), अलिबाग -महेंद्र दळवी (शिवसेना शिंदे गट), श्रीवर्धन- आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), महाड- भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) या सात जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाड व श्रीवर्धन या दोन ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी रत्नागिरी- उदय शामंत -उद्योग मंत्री (शिवसेना शिंदे गट), गुहागर -भास्कर जाधव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),