राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी महसूल विभागाशी पाठपुरावा केल्यामुळे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी राज्यमंत्री अशीष जयस्वाल तसेच महसूल सचिव, रोजगार हमी योजना सचिव, महासंचालक, कृषी विभाग उपसचिव, निमंत्रित आमदार यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी कोकणातील सामायिक सातबारा उताऱ्याबाबत हमीपत्र घेऊन रोजगार हमी योजना व कृषीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना देण्याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात आल्यानुसार महसूल मंत्री ना.बावनकुळे यांनी हमीपत्राचा शासननिर्णय काढण्याचे दिले निर्देश दिले आहेत.
आज कोकणातील बहुतांश जिल्ह्यात सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याच्या समोर आणेवारी नोंद नाही व खाते उतारा फोड न झाल्याने सामायिक जमीन असून सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अधिक नावे मोठया प्रमाणात आहे. कृषी विषयक वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेत असताना संमती न मिळाल्यामुळे कोकणातील शेतकरी वैयक्तिक लाभाच्या योजना पासून वंचित राहतो. कोकणातील शेती लहान तुकडयांमध्ये असून भात हे मुख्य पीक पावसाच्या आधारावर केले जाते उत्पादन कमी असल्याकारणाने स्थलांतर मोठया प्रमाणात आहे. कोकणातील शेतकरी बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजना, फलोत्पादन अभियान, कृषी विषयक योजना कोकणातील ग्रामीण भागात प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास उत्पादनात वाढ होऊन स्थलांतर थांबेल. शासकीय योजनांचा लाभ सातबारा सामायिक स्वरूपाचा व बहुतांशी खातेदार गुजरात, ठाणे, मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये स्थलांतर झाल्यामुळे संमती घेणे अवघड जाते. परिणामी शासकीय योजना कोकणामध्ये राबवणे अथवा अंमलबजावणी करणे कठीण जात आहे.
राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी खारभूमी विकास मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी महसूल विभागाशी पाठपुरावा करून मंगळवारी मंत्रालय 7वा मजला येथे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी राज्यमंत्री अशीष जयस्वाल, महसूल सचिव, रोजगार हमी योजना सचिव, महासंचालक, कृषी विभाग उपसचिव, निमंत्रित आमदार यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील सामायिक सातबारा बाबत हमीपत्र घेऊन रोजगार हमी योजना व कृषीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना देण्याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन दिवसांमध्ये ‘हमीपत्र’ करिता शासन निर्णय काढण्याचे निर्देश सचिव यांना देण्यात आल्या.