कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६ च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यामुळे तर हाल होतच आहेत परंतु आत्ता लाल परी तून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना देखील केवळ बस मध्ये सीएनजी भरण्यासाठी चार चार तास लाईन मध्ये उभा राहावे लागत असल्याने प्रवासी हतबल झाले आहेत तर नाम मुतारी व शौचालयाची सोय ना पिण्याच्या पाण्याची यामुळे महिला वर्ग व अबाल वृद्धांचे व लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे चित्र महाड आगारात पाहण्यास मिळत आहे.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सलग अठरा वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे गणेशोत्सव काळातील प्रवास मोठ्या हालअपेष्टेने सहन करावा लागला होता यातून काही प्रमाणात सुटका होत असताना लाल परीने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सीएनजी बस मध्ये भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बस महाड आगारात थांबल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सकाळपासून पाहण्यास मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिझेलवरील अनेक बसेस चे परिवर्तन सीएनजी बस मध्ये केल आहे महामंडळाच्या कोकणातून मुंबईत व मुंबईतून कोकणात जाणाऱ्या एसटी बसेस ना पनवेल ,पेण रामवाडी, महाड ,चिपळूण व रत्नागिरी या ठिकाणी सीएनजी भरण्याची सोय आहे मुंबईतून निघालेली बस सीएनजी भरण्यासाठी थेट महाड येथे येते या सीएनजीच्या ठिकाणी एका बसला सीएनजी भरण्यासाठी किमान २० मिनिटाचा कालावधी लागतो आज सकाळी महाड सीएनजी स्टेशनमध्ये नऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत सीएनजी भरण्यासाठी एसटी बसेस उभ्या आहेत आपला नंबर कधी लागेल यासाठी एसटी बस मधून जाणारे प्रवासी व एसटी बस चालक सीएनजी पंप चालकाकडे वारंवार जाऊन तगादा लावतात मात्र एसटी बसची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी वारंवार एसटी बसेस लावण्यावरून वाद-विवाद मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अनेक वेळेला ते वाद विवाद मिटवण्यासाठी महाड आगारातील कर्मचारी व सीएनजी भरण्यासाठी आलेल्या बस चालक व प्रवाशांना समजूत घालताना महामंडळाचे कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
एकंदरीत एसटी बसच्या सीएनजीच्या लाल परी तून प्रवास म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी झाली आहे गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर सीएनजी एसटी बसेस कोकणात सोडण्यात आल्या आहेत एकंदरीत वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणावर इंधन वाया जात आहे.
महिला वर्ग व आबाल वृद्धांचे मुतारी व शौचालय व पिण्याच्या पाण्याचे दुर्बीश्य
कोकणात जाणाऱ्या हजारो एसटी बसेस सीएनजी भरण्यासाठी महाड आगारातील सीएनजी बस स्थानकात येत आहे मात्र या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएनजी बस स्थानका जवळ कोणतीही शौचालय व मुतारीची सोय नसल्याने महिला वर्गांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे सीएनजी बस स्थानक ते एसटी महामंडळाचे महाड आगारातील मुतारी व शौचालयाचे ठिकाण यातील अंतर ४०० मीटर आहे मात्र एवढ्या काळात त्या ठिकाणी जाताना चुकून बस निघून गेली तर करायचे काय हा देखील मोठा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे.
याबाबत एसटी महामंडळाचे महाड आगार प्रमुख फुल पगारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र याबाबत महाड मनसेने याबाबत २ सप्टेंबर रोजी महाड आगारात पडलेल्या खड्ड्यांबाबत व महाड आकाराच्या दुरावस्थेबाबत गुरे बांधा आंदोलन केले होते त्या आंदोलनाच्या वेळी मनुष्याचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर व वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष फैसल पोपेरे जिल्हा सचिव शेखर सावंत सागर भोसले विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख भरत गंगधडे महिला शहर अध्यक्ष प्रतीक्षा कुलकर्णी यांनी त्यावेळेला महाड आगार प्रमुख फुल पगारे यांना महाड एसटी आगारातील शौचालय व मुतारीच्या दुरावस्थेबाबत तसेच सीएनजी स्थानका जवळ बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएनजी बस स्थानकात मुतारी व शौचालयाच्या सोयी बाबत ई टॉयलेट ची व्यवस्था करण्याबाबत सुचविले होते.
मात्र त्यानंतर देखील एसटी महामंडळाच्या महाड आगार प्रमुखांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज कोकणात जाणाऱ्या महिला व वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी एसटी महामंडळाने करणे गरजेचे असताना देखील महाड आगाराचे आगार प्रमुख याकडे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे या निमित्ताने पाहण्यास मिळाले