कोएसोच्या कै.सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वीचा ९१.८५% निकाल, कु. ठाकूर सुरज अशोक ९०.६७ % मिळवून प्रथम

School
सुकेळी ( दिनेशकै ठमके ) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल काल मंगळवार दि. २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कै. बापुसाहेब देशपांडे विद्या संकुलातील कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान , वाणिज्य व कला या तिन्ही शाखेचा १२ वीचा एकूण निकाल ९१.८५ टक्के इतका लागला असून यावेळी विज्ञान शाखेचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.
यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोएसोच्या कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान वाणिज्य व कला या तिन्ही शाखा मिळून एकूण ३०७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यातून २८२ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून कु. ठाकूर सुरज अशोक हा विद्यार्थी ९०.६७ % गुण मिळवुन प्रथम आला आहे. तर कु.म्हात्रे सार्थक कृष्णा पाटील ( ८६.५०%), कु.पाटील धनश्री संतोष( ८०.३३%) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत कु.नाईक निवेदन राम याने ७१.१७ टक्के गुण मिळवून प्रथम पटकाविला.तर कु. ताडकर अमिषा प्रवीण( ६५.६७%), कु.म्हात्रे सुमित रवींद्र (६३.५९%) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याचबरोबर कला शाखेतून
कु. ठाकूर भाग्यश्री दत्ताराम ही विद्यार्थिनी ७१.७६ टक्के गुण प्राप्त करत प्रथम आली तर कु.अंभोरे अंकिता भास्कर(६६.८३%) व बडे प्रणय प्रवीण(६३.३३%) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
दरम्यान फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेत कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयातील तिन्ही शाखेतील उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयभाई पाटील, स्थानिक शाळा समितीचे चेअरमन नरेंद्र जैन, प्राचार्या राधिका ठाकूर, वरिष्ठ लिपिक संतोष गोळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *