कुर्डुस विभागातील ज्येष्ठ नागरिक संस्थेचा दशकपूर्ती सोहळा दिमाखात साजरा !

Panditshet
अलिबाग : ज्येष्ठ नागरिक कुर्डुस विभाग या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा संस्थेचे विद्यामान अध्यक्ष  यशवंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली आणि मा. आमदार पंडीतशेट पाटील व मा. संजय राऊत सनदी अधिकारी, अलिबाग यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडला. या प्रसंगी सावित्रीच्या लेकींनी मान्यवरांचे औक्षण केले व दिप प्रज्वलन आणि गणेश पूजनाने मांगल्यमय वातावरणात कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
 संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाळ श्रीफळ व भेटवस्तु देऊन सन्मान करणेत आला. आपल्या मनोगतात मा. पंडीतशेट यांनी ज्येष्‍ठ नागरिकांप्रती असलेल्या आदरापोटी ज्येष्ठानी सुदृढ आयुष्याकरीता समतोळ व पचनास हळका आहार घेणे, फिरावयास रोज जाणे, आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वत:च घेणे विषयीचे आवाहन   केले.
Kurdus Jeshta
तसेच संस्थेचे वय वाढत जाते तशी संस्था अधिक विस्तारित मजबुत होत असते तर माणसाचे याच्या बरोबर उलट असते असे प्रतिपादन मा. संजय राऊत यांनी केले. संस्थेचे ३०० सभासद हे तळगावातील असून ते सर्वसमावेशकतेचे प्रतिक आहे. कोणतीही सामाजिक संस्था जन्मत: लक्षाधिश नसते, आपल्या सारख्याच्या आर्थिक सहकारातून आणि योगदानातुन या संस्थाच वटवृक्षात रूपान्तर होत असते. संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे  विकास पाटील, बाळ सिंगासने, अमृत पाटील,  ज. का. ठाकूर यांनी आवर्जून बोलतांना उल्लेख केला व संस्था अधिकाअधिक कार्यप्रवण होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गतवर्षी राबविलेले उपक्रम
 या संस्थेच्या माध्यमातून गतवर्षी ५०० गरजुंची नेत्र तपासणी करण्यात येऊन ३०० सामान्य गरजु गरिब नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया रामकृष्ण मिशन हॉस्पीटल, खार मुंबई व लासन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढी यांच्या संपूर्ण सहकार्याने करण्यात आल्या. त्याच बरोबर ज्येष्‍ठ नागरिकांना एस. टी. चे स्मार्ट कार्ड, ज्येष्ठांचे वाढदिवस, विवाहास ५० वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा लग्न वाढदिवस महिलांच्या दृष्टीने धार्मिक सामाजिक उपक्रम राबविले.
Kurdus Jeshta2
सावित्रीच्या लेकींचा सहभाग
ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेच्या या दशकपूर्ती सोहळ्यास सावित्रीच्या लेकींचा सहभाग व कर्तव्यदक्षता वाखाणण्यासारखी होती. आपल्या संस्थेप्रती असलेली आत्मीयता आदर त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रतीत होत होती. मी कुणीही नाही या निरपेक्ष भावनेने कार्यरत असणाऱ्या वनिता पिंगळे, करूणा पाटील, मिना पिंगळे,  द्रौपदी पाटील,  सुचिता म्हात्रे आणि इतर माण्यवर भगिनी यांनी या गोजीरवाण्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
Kurdus Jeshta1
धडाडीचे पदाधिकारी
 सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यशवंत पाटील उपाध्यक्ष सुभाष म्हात्रे आणि उपाध्यक्ष  सुभाष म्हात्रे आणि  माजी उपाध्यक्ष सखाराम जानू पाटील, सचिव अशोक पाटील, खजिनदार जनार्दन पाटील, चंद्रकांत म्हात्रे, श्रीधर पाटील, प्रभाकर घरत, शामकांत पिंगळे, रामचंद्र बांधणकर, बबन पिंगळे आणि मान्यवर सभासदानी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलक बबन पिंगळे यांनी केले तर सुधाकर पिंगळे यांनी सर्वाचे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *