कुरुळ ग्रामपंचायतचा लाचखोर ग्रामसेवक, लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

Kurul Gramsevak

अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 

रायगड जिल्ह्यातील कुरुळ येथे घरास घरप‌ट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणेकरीता लाचखोर ग्रामसेवक श्रीहरी अर्जुनराव खरात, (वय 36 वर्षे, धंदा- नोकरी, ग्रामसेवक, नेमणूक- कुरूळ ग्रामपंचायत, अलिबाग रायगड. राह- सीगल रेसिडेन्सी, बिल्डींग नं.6, खोली नं. 202, गोंधळपाडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. (वर्ग 3)) व सुजित श्याम पाटील उर्फ पिंट्या,( वय 39 वर्षे, धंदा- नोकरी, लिपिक, नेमणूक- कुरूळ ग्रामपंचायत अलिबाग रायगड. राह- गाव कुरूळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. (वर्ग 4) यां दोघाना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यांतील तक्रारदार यांचे मौजे कुरूळ गट क्रमांक ३४/४ या जागेवर स्वतंत्र घर बांधलेले आहे. सदर घरास घरप‌ट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणेकरीता श्रीहरी खरात, ग्रामसेवक ग्रामपंचायत कुरूळ हे ५०,०००/- रूप्ये रूपये लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी दिनांक १६/०८/२०२४ रोजी १५.३५ ते १६.४५ वाजण्याचे दरम्यान तक्रारदार यांचेकडे ग्रामपंचायत कार्यालय, कुरूळ येथे ५०,०००/- रूपये लाचेची मागणी करून, लाचेची रक्कम सुजित शाम पाटील उर्फ पिंटया लिपिक, कुरूळ ग्रामपंचायत यांचेकडे देण्यास सांगितली.
त्याप्रमाणे दिनांक २०/०८/२०२४ रोजी कुरूळ ग्रामंपचायत कार्यालयात सापळा आयोजित केला असता ग्रामसेवक खरात यांनी तक्रारदार यांचेकडे पुर्वी मागणी केल्याप्रमाणे रूपये ५०,०००/- लाचेची मागणी करून लाचेची रक्कम लिपिक सुजित शाम पाटील उर्फ पिंट्या यांचेकडे देण्यास सांगितली. त्याप्रमाणे सुजित शाम पाटील उर्फ पिंट्या यांना तक्रारदार यांचेकडून कुरूळ ग्रामपंचायत कार्यालय आवारात ५०,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष १३.०५ वाजता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहाय्यक फौजदार अरूण करकरे, पोलिस हवालदार महेश पाटील, चालक पोलिस हवालदार सागर पाटील आदीच्या पथकाने यशस्वी करवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *