कुणबी समाज भूषण जेष्ठ समाज सुधारक शिक्षण महर्षी रायगड भूषण रा. ग. पोटफोडे मास्तर यांचे निधन

Potfode
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
कुणबी समाज भूषण ज्येष्ठ समाज सुधारक,शिक्षण महर्षी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, रायगड भूषण रामचंद्र पोटफोडे ( मास्तर ) यांचे मंगळवारी १६ जुलै रोजी वयाच्या ९८ व्यां वर्षी वयोवृध्दकाळाने निधन झाल्याने कुणबी समाजात तसेच शैक्षणीक क्षेत्रात त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून पोटफोडे कुटुंबावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे.
कुणबी समाज्यातील तसेच खांब परिसरातील शैक्षणीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एका सूर्याचा अस्त झाला.श्रमजीवी कष्टकरी शेतकरी वर्गाला सातत्याने न्याय देण्यासाठी झटले गोवे येथील शेतजमिनीच्या बेदखल कुळाच्या प्रश्नांसाठी त्यानी मोठा लढा देत कित्येक हेक्ट्टर शेत जमीन खोत्यांच्या तावडीतून बळीराजाला मिळवून दिल्या तर यासाठी मोठा संघर्ष करत कारावास देखील सहन करावा लागला तर पोटफोडे मास्तर हे नाव आणि पैश्यासाठी न्हवे तर सूर्या प्रमाणे प्रकाश देत येथील गोरगरिब जनमानसाला मदत करत त्यांना न्याय देण्यासाठी झटले तर सर्व सामान्य कुटुंबियांच्या घरात शिक्षणातून प्रकाश पडावे असे त्यांचे महान कार्य त्यांनी केले. शाहू, फुले,आंबेडकर तसेच पुरोगामी विचारांचा एक सच्चा सामाजिक शैक्षणीक राजकीय, सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याने लहान थोरांसह दुःखाचे अश्रु अनावर झाले.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असताना कुणबी समाजाला सदैव न्याय आणि दिशा देण्याचे काम पोटफोडे मास्तर यांनी केले शेकापचे नेते स्व.प्रभाकर पाटील, दी.पा.पाटील.दत्ता पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून येथील शेतकरी कष्टकरी जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केले.सारी हयात कुणबी समाजाच्या हितासाठी घालविली. तर कै.द.ग. तटकरे यांच्या समावेतही काम करून राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. तसेच शेतकरी वर्गाच्या हितासाठी सावकारशाही विरोधात लढा देऊन कित्येकदा तुरूंगवासही भोगला. तसेच रा.जि. परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळून आपल्या विभागात विविध प्रकारची विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली.
तसेच खांब परिसरातील गोरं गरीब श्रमजीवी शेतकरी कष्टकरी यांच्या मुलांना रयत शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी स्थानिक बहुजन समाजाला एकत्रित करून नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेच्या वतीने संचालित सरस्वती विद्यालय खांब येथे प्रथम माध्यमिक शाळा सूरू करून अनेक मुलांना शिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली तदनंतर त्याचे रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय असे नामकरण करण्यात आले तसेच खांब देवकान्हे तसेच राजखळाटी विठ्ठलवाडी गारभट या परिसरात देखील जिल्हा परिषद शाळा शिक्षणानंतर येथील शिक्षित मुलांना माध्यमिक शिक्षण मिळावे म्हणून येथील शेतकरी समाज बांधव नागरिकांच्या श्रमदानातून श्रमिक विद्यालय चिल्हे ,द न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी असे दोन माध्यमिक विद्यालय उभारण्यात यशस्वी ठरलें शिक्षण संस्था उभारण्यासाठी त्यांना जीवाची अनेक पराकाष्ठा करावी लागली परंतू गोर गरीब शेतकरी यांचा मुळगा मुलगी शिकली पाहिजे ती सुसंस्कृत बनली पाहिजे त्यांनी नोकरी व्यवसायात यशस्वी भरारी घेतली तरच तो आर्थिदृष्टया सक्षम होईल ही भावना ही तळमळ उराशी बाळगून समाजसेवेचे एकनिस्टेने काम करत एक नव्हे तर ग्रामीण भागात तीन माध्यमिक विद्यालय शाळा काढल्या आणि त्यातून अनेक शिक्षित पिढ्या उदयास आल्याचे समोर दिसत आहेत.
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे संस्थापक –अध्यक्ष,रा.जि.परिषदेचे माजी उपाध्यक्ष, सहकारमहर्षी तथा रायगड भूषण थोर शिक्षण महर्षी रा.ग.पोटफोडे(मास्तर) यांच्या अंत्ययात्रेला फार मोठा जनसमुदाय लोटला होता. त्यांच्या दुःखद निधनाने समाजात सर्वच क्षेत्रात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना अनेकांनी सांत्वनपर व्यक्त केली आहे. तर जड अंतःकरणाने व शोकाकुल वातावरणात पोटफोडे मास्तर यांना सामजिक शैक्षणीक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील असंख्ये दुःखी समाज बांधव यांनी शिरवली येथील वैकुंटधाम येथे श्रध्दांजली अर्पण करून येथे अखेरचा निरोप देण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सहा मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा गोतावळा असून त्यांचे दशक्रियाविधी गुरूवार दि.२५ जुलै तर अंतिम धार्मिकविधी तेरावे रविवार दि.२८ जुलै रोजी मौजे शिरवली येथील निवासस्थानी
होणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *