कुंडलिका नदीला मोठा पुर; रोहा तालुका जलमय!

Roha City
रोहा :
तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने रोहयाच्या कुंडलिका नदिने धोक्याची पातळी ओलांडत मोठी पुर परिस्थिती निमार्ण केली. रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर 3 ते 4 फूट पाणी आहे, तर उंच असलेल्या नवीन पुलाला लागून पाणी वाहत आहे. दोन्ही बाजूकडे पुराचे पाणी भरल्याने रोहा अष्टमीकरांसाठी नवीन पूल ही कुचकामी ठरला, पुराच्या पाण्याने संपर्क तुटल्याने वाहतूक बंद पडली, प्रवासीही मोठ्या संख्येने रखडले. रोहा -अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटाव मध्ये पुराचे पाणी शिरले असून तालुका जलमय झाला आहे.
गेली काही दिवस मुसळधार पावसाने सबंध तालुक्याला झोडपून काढले. धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला मोठा पूर आला. मध्यरात्री पासून नदीची पाणी पातळी जलद गतीने वाढू लागली. रोहा शहरातील नगर पालिका चौक, सावरकर मार्ग, कोर्ट रोड, मुख्य बाजारपेठ, सत्यनारायण रोड, बोहरी गल्ली, एस.टी. स्टँड समोर, फिरोज टॉकीज लगत आदी भागात पाणि मोठ्या प्रमाणात शिरले, बाजारपेठेत काही दुकानांमध्ये पाणि शिरले, तर बायपास रोड, दमखाडी, त्रिमूर्ती नगर, रायकर पार्क, चनेवाले कॉम्प्लेक्स, डबीर चाळ, गोकुळ बिल्डिंग, मुरुड रोड, अष्टमीसह वरसे, रोठ, धाटाव मध्ये पुराचे पाणि मोठ्या प्रमाणात शिरले. अष्टमीत आणि कोलाड मार्गावर रस्त्यावर पाणि भरल्याने पलिकडील गावांचा संपर्क तुटला.
कुंडलिका नदी पात्रात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातिल माती भरावामुळे शहरातील सखल भागासह वरसे, रोठ आधी नदी लगतच्या परिसरात मध्ये पुराचे पाणी शिरल्याचे पुन्हा एकदा समोर आले. वरसेमध्ये सखल भागात पाणी जमायचे मात्र आजच्या पुराने नवरत्न हॉटेल ते वरसे स्टॉप दरम्यान पाणी भरून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली, रोठ गावा लगत ही काही ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने नदी पात्रात करण्यात आलेल्या माती भरावा बाबत तीव्र शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली गेली.
बाजारपेठ, एस टी स्टँड मागे, धनगर आळी आदी ठिकाणी यावेळी पुराचे पाणि शिरले, पाऊसाने पूरपरिस्थिती अधिक प्रभावी बनल्याने नागरिकांत संभ्रमावस्था आहे. रोहा नगर पालिके तर्फे रिक्षा फिरवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *