शिवगणेश गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण काळे यांना मातृ शोक झाले असून, यांच्या मातोश्री शामल शशिकांत काळे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार 15 जुन रोजी सकाळी 11.00 वा. च्या सुमारास निधन झाले.
अतिशय प्रेमल व मनमिळावू स्वभावाच्या शामल काळे यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात किरण व राजेंद्र काळे हे दोन मुलगे,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
शामल काळे यांचे दशक्रिया विधी सोमवार 24 जुन रोजी अंबा घाट येथे तर उत्तरकार्य गुरुवार 27 जुन रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती काळे कुटुंबियांनी दिली.