कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल राखूमाई मंदिरात धार्मिक कार्यक्रम

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल राखूमाई मंदिरात धार्मिक कार्यक्रम
नागोठणे ( महेंद्र माने ) :
विठ्ठल रखुमाई मंदिरात मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित्त संत सेवा मंडळ यांच्या सहयोगाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पहाटे 4.00 वाजता काकड आरती, पहाटे 05 वाजता सरपंच सुप्रिया महाडीक व संजय महाडीक,ह.भ.प.श्री.व सौ. बळीराम जाधव व श्री. व सौ. संतोष नागोठणेकर यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. सकाळी 10.00 वाजता पंचक्रोशी वारकरी सांप्रदायचे भजन तसेच सायंकाळी 7.00 वाजता हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संत सेवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच विभागातील भाविक उपस्थित होते. कार्तिकी एकादशी निमित्त शहरासह विभागातील भाविकांनी विठ्ठल मंदिरात जावून विठुरायाचे दर्शन घेतले असून सर्व भाविकांना मोहित प्रोव्हिजन यांच्या कडून अल्पोंहारची(फराळ) व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विजय शहासने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *