मित्रासोबत पालघर येथे जात आहे असे सांगून कामोठे सेकटर 7 येथील घरातून निघून गेलेला 44 वर्षीय अप्पू अरुण विश्वास घरी परत न आल्याने तो हरवला असल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
त्याची उंची पाच फूट, पाच इंच, रंग सावळा आहे. त्याने अंगात निळसर रंगाचा टी-शर्ट , काळ्या रंगाची साधी पॅन्ट घातली आहे. त्याच्या डाव्या हातामध्ये लोखंडी कडा आहे तसे डाव्या हातावर रूपा असे गोंदण केलेले आहे.
उजव्या हातावर अर्णव आणि अर्पिता व अर्णव असे इंग्लिश मध्ये नाव गोंदलले आहे. या इसमा सोबत अधिक माहिती असल्यास महिला पोलीस नाईक एस काटकर यांच्याशी संपर्क साधावा.