कर्जत तालुक्यात वीज तक्रारीत वाढ: वीज ग्राहक संघर्ष समितीची महावितरणला कडक ताकीद

कर्जत तालुक्यात वीज तक्रारी वाढ: वीज ग्राहक संघर्ष समितीची महावितरणला कडक ताकीद
कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
कर्जत तालुक्यात वीजेच्या तक्रारी वाढल्याने दि. १७ ऑक्टोबर रोजी कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कार्यकारी अभियंता शिंदे तसेच उपअभियंता केंद्रे यांची महावितरणच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांनी आंदोलनामध्ये महावितरणने दिलेल्या लेखी आश्वासनाची उजळणी करून ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी कमी करण्याची तसेच वीज जाण्याचे प्रमाण कमी करण्याची तंबी दिली.
आंदोलनानंतर सुरु झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार केली व अशा कामांना थांबवण्याची तसेच कामचुकार अधिकारी व कर्मचारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच इतर समस्यांवर चर्चा करून ग्राहकांच्या वाढलेल्या तक्रारी कमी करा अन्यथा स्थगित केलेले आंदोलन पुन्हा कधीही सुरु करण्यात येईल  असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. 
यावेळी वीज ग्राहक संघर्ष समितीने महावितरण अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. बैठकीदरम्यान कार्यालयाने दिलेला चहा व पाणी स्पष्टपणे नाकारून, “आधी तालुक्याची कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण करा,” अशी ठाम मागणी केली. पुढील चार-पाच दिवसांत महावीर पेठेत ट्रान्सफॉर्मर बसवला जावा, ही आग्रही भूमिका मांडली. अशा प्रकारे काल वीज ग्राहक संघर्ष समिती व महावितरण यांच्यात बैठक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *