कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात सुधाकर घारे यांना अनुकूल वातावरण; स्वराज्य संविधान रक्षक सेना पँथर आर्मीचा जाहीर पाठिंबा

Swarajya Armee Karajat
कर्जत ( गणेश पवार ) : 
कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचा घटक व मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे सुधाकर घारे व कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामुहिक राजीनामा देत दि. २५ ऑक्टोंबर रोजी सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मोठे प्रमाणात रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला व त्यांना इतर पक्ष संघटना यांचा मोठया प्रमणात पाठींबा मिळत असतानाच स्वराज्य संविधान रक्षक सेना पँथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशिलभाई जाधव यांनी पत्रकार परिषद घेत, अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना जाहिर पाठींबा असल्याचे जाहिर केले आहे.
कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचा राजीनामा देत कर्जत -खालापूर विधानसभा मतदार संघातून दि. २५ ऑक्टोंबर रोजी मोठ्या प्रमाणात रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत साधारण २० ते २५ हजार जनसागराच्या साक्षीने आपला अपक्ष उमेदवारी नामनिर्देशन अर्ज दाखल केला व त्यांना इतर पक्ष व संघटनांकडून मोठया प्रमाणात पाठींबा मिळत असतानाच, स्वराज्य संविधान रक्षक सेना पँथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशिलभाई जाधव यांनी दि.२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रॉयल गार्डन येथील हॉल मध्ये जाहिर पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना जाहिर पाठींबा असल्याचे जाहिर केले आहे.
यावेळी कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात जसा विकास व्हावा तसा विकास झालेला नाही. या प्रभागात तरूण तरुणींना रोजगार नाही. आपल्या महिला भगिनी सुरक्षित नाही.वाढती गुन्हेगारी असलेली पाणी टंचाई या विरोधात संदर्भात समाज बांधवात जनजागुतीचे काम व सुधाकर घारे यांनी मतदार संघात गोर गरीबांसह आदिवासी बांधवांसाठी केलेले अमुल्य कामांचे कार्याचा प्रसार हा सर्व प्रभागात सांगण्याचे व विकास कार्याला साथ, अन्याय अत्याचारावर मात, यावर सुधाकर घारे हे करतील आघात असा नारा देत मतदारांना अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना मतदान करण्याचे अहवान मतदारांना करणार असल्याचे व सुधाकर घारे यांना १० हजाराचे मताधिक्य देणार असल्याचे स्वराज्य संविधान रक्षक सेना पँथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशिलभाई जाधव यांनी जाहिर केले आहे.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशिलभाई जाधव, कर्जत तालुका अध्यक्ष रोहित जाधव, कर्जत उपाध्यक्ष पॅंथर आशिषभाई खंडागळे, पॅंथर प्रशांत जाधव आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *