कर्जत खालापूर मतदार संघातील विकास कामांचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा न भूतो न भविष्यती ठरणार : आ. महेंद्रशेठ थोरवे

Mahendra Thorave1
माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : जनतेने दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर कर्जत खालापूर मतदार संघात जी काही अभूतपूर्व विकास कामे केवळ तीन वर्षांच्या कालावधीत मार्गी लागली आहेत.
जवळपास ८०० कोटी रुपयांचा निधी या मतदार संघासाठी आणण्यात आला होता, यातून जनतेला अभिप्रेत असणारी बहुतांश विकास कामे पूर्ण झाली असून दि.७ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जवळपास २७२ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी नागरिकांनी या विकास कामांचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा न भूतो न भविष्यती ठरणार असल्याने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दि.५ रोजी कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.या मतदार संघात अनेक महत्वपूर्ण लोकाभिमुख विकास कामे राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण झाली असून काही कामे पूर्णत्वास येत आहेत. असे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सांगितले.
 सामाजिक, सांस्कृतिक वारसा जोपासत प्रति पंढरपूर म्हणून कर्जतच्या लोकप्रियतेत भर घालण्यासाठी ५२ फुटी श्री विठ्ठलाची मूर्ती बसविण्यात आली आहे. या पवित्र अशा लोकार्पण सोहळ्यासाठी या मतदार संघातील जे वारकरी संप्रदाय आहेत त्यांच्या साक्षीने हा भव्य दिव्य कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे अनावरण सुध्दा यावेळी करण्यात येणार असून श्रीसदस्य मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यामुळे अध्यात्मिक वातावरण निर्मिती कर्जत शहरात पहावयास मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक, प्रशासकीय भवन ह्या कामांचा लोकार्पण सोहळा सुध्दा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील आणि कर्जत तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ माथेरान मध्ये ज्या काही अत्यावश्यक बाबी पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून अपूर्ण आहेत त्या लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.हा एक ऐतिहासिक सोहळा असून त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी पंचवीस हजार पेक्षाही अधिक जणांची उपस्थिती लाभणार असून
एकूणच कर्जत खालापूर मतदार संघाचे नंदनवन करण्यासाठी प्रयत्न असल्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी नमूद केले.या पत्रकार परिषदेस रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर,उप जिल्हा प्रमुख भाई गायकर,खालापूर शिवसेनेचे नेते अमोल पाटील,विधानसभा नेते पंकज पाटील,मा.उप सभापती मनोहर थोरवे,नगरसेवक संकेत भासे, अरुणदेशमुख, शहरप्रमुख अभिषेक सुर्वे,शहर संघटक नदीम खान यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *