कर्जत मुरबाड महामार्गांवर पोही गावाजवळ तीन फाट्यावर सकाळी सुमारे 8 वाजून 30 मिनिटाच्या च्या सुमारास ट्रक व रिक्षाचा भीषण अपघात घडला. यामध्ये टाटा कंपनीची अल्ट्रा 1918 ट्रक क्रमांक एम एच 04 के यु 1398 ही ट्रक चालक अमर राठोड रा. बदलापूर हा पनवेल वरून एच पी गॅस च्या सिलेंडर घेऊन आपला ट्रक शहापूर च्या दिशेने निघाला होता.
कळंब जवळील पोही येथे तीन फाट्यावर गाडी भरधाव वेगाने येत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक ने नेरळ दिशेला जात असणाऱ्या रिक्षा चालक यशवंत परशुराम डोंगरे रा. बोरगाव यांची रिक्षा क्रमांक एम एच 46 बी पी 6843 या रिक्षाला जोरात धडकेने रिक्षा बाहेर फेकली गेली. त्यावेळी रिक्षामध्ये गौतम बनसोडे व अवधूत सोनावणे हे दोन प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून प्रवासी व रिक्षा चालक यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मात्र आटो रिक्षा पूर्ण चक्काचूर झाली असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर गॅस सिलेंडरची गाडी कळंब पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वसावे करत आहेत.
———————————
अवजड वाहनांमुळे कर्जत मुरबाड महामार्गांवर दुर्घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. धोकादायक वळणावर PWD ने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे.