कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावर टाकादेवी येथे वटवृक्ष उन्मळून पडला; वाहतूक ठप्प, सूचित थळे यांच्या अथक प्रयत्नाने वाहतूक सुरळीत

Wad
अलिबाग/सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्यावर ८ जुलै रोजी दुपारच्या वेळी टाकादेवी येथे पावसामुळे वटवृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी युवा नेता व सामाजिक कार्यकर्ते सूचित थळे यांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नाने सदर वटवृक्ष बाजूला करण्यात यश आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड दरम्यान टाकादेवी येथे दुपारच्यावेळी एक मोठा वटवृक्ष पावसामुळे उन्मळून पडले होते. यावेळी कोणतीही हानी झाली नाही, मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व मापगाव ग्रामपंचायत माजी सरपंच सुनिल दशरथ थळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेता सुचित थळे यांनी स्वतःच्या जेसीबीच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत अमित थळे, हेमंत थळे, सागर दळवी, प्रज्ञेश दळवी, प्रशांत घरत, जितेंद्र दळवी व इतर सहकारी उपस्थित होते.
याबद्दल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व वाहनचालकांनी तसेच या परिसरातील ग्रामस्थांनी सुनिल थळे, सूचित थळे व सहकाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *