पनवेल तालुक्यातील रोहिंजण कंटेनर प्रा.लि. या कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये ठेवलेला कस्टम ड्युटी न भरलेला माल आरोपींनी माहे जुलै 2022 ते जुलै 2023 या कालावधीत विना परवानगी बाहेर काढून जवळपास 3 कोटी 95 लाख 87 हजार 838 रुपये रकमेच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
अब्दुल नाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील कंटेनर यार्डमधून आरोपी सुशिल मंडल याने नोकरीत असताना त्याच्या इतर साथीदारांशी संगनमत करून कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये ठेवलेले मोबाईल बॅक कव्हर, अमोनियम क्लोराईड व सीडस, पॅकींग मटेरियल ऑफ मोबाईल, सिंगल शाफ्ट शेरेडर फॉर प्लॅस्टीक लॅम्पस, मोबाईल अॅसेसिरीज बॅटरीज्, गर्ल्स स्लिप, कॅजुअल शुज असा विविध प्रकारचा एकूण 3 कोटी 95 लाख 87 हजार 838 रक्कमेचा मालाचा अपहार झाला होता.
याबाबतची तक्रार दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनि उमेश गवळी, सपोनि प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनील गिरी, पो.हवा.मधुकर गडगे, अनिल पाटील, रमेश शिंदे, रणजित पाटील, निलेश पाटील, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, तुकाराम सुर्यवंशी, दिपक डोंगरे, अजित पाटील, सागर रसाळ, पो.ना.अजिनाथ फुंदे, पो.शि.विक्रांत माळी आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी मयुरेश चासकर (28), शैलेश ठाकूर (43), महेश शिवले (40), शमशुद्दीन सय्यद (59), अपुर्वा शहा (24) व राजीवकुमार जायस्वाल (36) या आरोपींना विविध ठिकाणाहून ताब्यात घेवून त्यांच्याकडून जवळपास 14 लाख 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तर गुन्ह्यातील 6 आरोपी पसार असून त्यांचा शोध पोलीस करीत आहेत.