ऐनघर येथिल ह.भ.प. मारुती करंजे वैकुंठात विलिन

Maruti Karanje
सुकेळी ( दिनेश ठमके) :
रोहा-सुधागड तालुक्यात वारकरी सांप्रदायात ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य घालवले तसेच मृदुंगाचार्य अशी ओळख असलेले रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर गावातील ह.भ.प.मारुती महाराज करंजे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी शुक्र.( दि. २६) रोजी सायंकाळी आकस्मित निधन होऊन ते वैकुंठवासी विलिन झाले.
त्यांच्यावर शनि.(दि.२७) रोजी सकाळी ११ वाजता ऐनघर येथिल वैकुंठभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला वारकरी सांप्रदयासह, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या निधनामुळे वारकरी सांप्रदायात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मोठ्या प्रमाणात कंरजे परिवार असुन त्यांचे दशक्रिया विधी रवि. दि. ४ आॅगस्ट तर उत्तरकार्य बुध.दि. ७ आॅगस्ट रोजी ऐनघर येथे राहत्या घरी होणार असल्याचे कंरजे कुटुंबियांकडुन सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *