एर्टीगा गाडीला झालेल्या भीषण अपघातात पोलिस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू !

Accident Panvel Ertiga
पनवेल ( संजय कदम ) :
पनवेल जवळ पहाटेच्या सुमारास एका एर्टिगा गाडीला झालेल्या अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आज पहाटे एर्टिगा गाडी क्रमांक MH- 43 CG- 89 88 वरील चालक सुरज रामचंद्र चौगुले पार्कसाईट पोलीस ठाणे मुंबई हे त्यांच्या ताब्यातील वाहन घेऊन मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने मुंबई बाजूकडे चालवत घेऊन जात होते. पनवेल जवळील किलोमीटर 5.100 येथे आले असता त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पहिल्या  रेलिंगला जाऊन जोरात धडकली आणि रेलिंग मध्ये अडकून त्यात ते गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पाठवण्यात आले त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने शोल्डर लेनवर घेण्यात आली असून नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहतूक पोलीस व पळस्पा मोबाईल वर पथक ,आयआरबी स्टाफ, देवदूत टीम, तळोजा पोलीस ठाण्याचे अधिकारी, खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, पनवेल तालुका पोलीस ठाणे खांदेश्वर पोलीस ठाणे पथक घटना स्थळी उपस्थित होते. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *