ऋतिका प्रज्वल थळे युनिव्हर्सिटी मुंबई येथून मास्टर ऑफ सायन्समध्ये अलिबाग मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

Rutika Thale
अलिबाग/सोगांव (अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील पोलीस पाटील प्रफुल्ल थळे यांची सून व प्रज्वल प्रफुल्ल थळे यांची पत्नी तसेच वायशेत येथील प्रमोद शिवदास पाटील यांची कन्या ऋतिका प्रज्वल थळे यांनी जे.एस.एम. कॉलेज अलिबाग(युनिव्हर्सिटी मुंबई) येथून नुकत्याच झालेल्या ‘मास्टर ऑफ सायन्स’ हि पदवी अलिबाग तालुक्यातुन पहिल्या फेरीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्राप्त केली आहे, याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
ऋतिका थळे यांनी यापूर्वी चोंढी येथे बी.एस.सी चे शिक्षण पूर्ण केले तर जे.एस.एम. कॉलेज अलिबाग येथे एम.एस.सी.चे शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटी मधून पूर्ण करून पदवी मिळवली आहे.
याबाबत रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, ग्रामपंचायत गुंजीस माजी सरपंच महेश पडते, प्रफुल्ल थळे, चंद्रकांत खोत, विजय घरत, सोमनाथ थळे, सीताराम कवळे, राजेंद्र पडते, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सूचित थळे, राजेंद्र घरत, प्रज्वल थळे, किशोर सातमकर, आदींनी ऋतिका थळे यांच्या बहिरोळे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप देत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *