उरण नगर परिषदेमधील सफाई कामगारांची दिवाळी होणार गोड

उरण नगर परिषदेमधील सफाई कामगारांची दिवाळी होणार गोड

उरण ( विठ्ठल ममताबादे ) :

म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या वतीने उरण नगरपरीषदेमध्ये अनेक वर्षे असंघटीत असलेल्या अनुसूचित जातीचे, जमातीचे बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधी मिळावा, ESIC या आरोग्य योजनेचा लाभ , बोनस मिळावे या मागण्यांसाठी दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून कामबंद आंदोलन केले होते आणि दि. १० ऑक्टोबर २०२४ पासून आमरण उपोषण सुरु झाले होते.
म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव आणि कार्याध्यक्ष कामगार नेते संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले . या आंदोलनाच्या अनुषंगाने दि. १० ऑक्टोबर २०२४ उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या दालनात कामगार नेते ॲड सुरेश ठाकूर, अनिल जाधव आणि कामगार नेते संतोष पवार यांची कंत्राटदार देशमुख यांच्या समवेत बैठक झाली.
या बैठकीमध्ये मुख्याधिकारी समिर जाधव यांनी सकारात्मक भूमिका घेऊन येत्या काळात म्हणजेच दोन दिवसांत नवीन टेंडर प्रसिद्ध करणार आणि सध्यास्थीत अनेक वर्षांपासून कार्यरत उरण नगरपरीषदेमधील सर्व गोरगरीब पददलीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार तसेच या कंत्राटी कामगारांना एप्रिल २०२४ पासून किमान वेतन, नियमाप्रमाणे EPF, ESIC आणि ८.३३ % बोनस कंत्राटदाराने देणे बंधनकारक आहे अन्यथा सदर कंत्राटदाराची मागिल देयके आदा करणे शक्य होणार नाही वेळ प्रसंगी मला कंत्राटदारावर कारवाई करावी लागेल ही भूमिका घेतल्यामुळे में. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट प्रा लि या कंपनीचे मालक  देशमुख यांनी १९४८ च्या किमान वेतन कायद्यानुसार तसेच वेळोवेळी मा. आयुक्त तथा संचालक यांचे संचालनालयातर्फे वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन करण्याचे मान्य केल्यामुळे म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर यांनी उरण नगरपरीषदेमध्ये पुकारलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.आणि मुख्याधिकारी समिर जाधव यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने उशीरा का होईना परंतू न्याय प्रस्थापित केल्याबद्दल अभिनंदन केले.
या आंदोलनाची सांगता मुख्याधिकारी समिर जाधव यांनी कंत्राटी सफाई कामगारांना पाणी प्यायला दिले आणि आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. ज्याचा शेवट गोड त्यांचे सर्व गोड या प्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याना आता मासिक वेतन रक्कम रू. १० हजाराच्या रक्कम रू. १८ हजार मिळणार आणि मागील चार महिन्यांतील वाढिव पगार थकबाकीसह रक्कम लवकरच मिळेल.यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या मान्य झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी समीर जाधव व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *