महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्यात येत असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकाच दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहेत. या निवडणुकांचा एकत्रित निकाल ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केला जाणार आहे.
उरण तालुक्यात या निवडणुकीसाठी एकूण चार जिल्हा परिषद सदस्य पदे आणि आठ पंचायत समिती सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे. दिनांक १६ जानेवारी २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संभाव्य उमेदवारांकडून हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही तयारीला लागले असून प्रचाराची धावपळ वाढताना दिसून येत आहे.
दरम्यान, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक विकासाचा आराखडा आणि जनतेच्या अपेक्षा यावरच मतदारांचा कौल ठरणार असल्याने उरण तालुक्यातील नागरिकांमध्ये या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकूण जिल्हा परिषद व त्यांचे आरक्षण
१)नवघर – सर्वसाधारण स्त्री
२)जासई – नागरिकांचा मागस प्रवर्ग (ना.मा.प्र )
३)चाणजे – सर्वसाधारण स्त्री
४)चिरनेर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र)
पंचायत समिती व त्यांचे आरक्षण
१)नवघर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र)
२)भेंडखळ -सर्वसाधारण
३)जासई -सर्वसाधारण स्त्री
४)चिर्ले -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (ना. मा. प्र. स्त्री )