इंडियन नेव्हीमध्ये B.Tech डिग्रीसाठी सुवर्णसंधी

Indian navy academy
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
भारतीय नौदलामार्फत 102 (B.Tech) कॅडेट एन्ट्री स्कीम जानेवारी 2026 पर्मनंट कमिशनसाठी अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. हा कोर्स केरळ येथील Indian Naval Academy, Ezhimala येथे सुरू होणार आहे.
एक्झिक्युटिव्ह व टेक्निकल ब्रँचसाठी जागा:
  • एकूण जागा: 44 (यामध्ये महिलांसाठी 6 जागा राखीव)
  • शाखा: इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल
पात्रता:
  • १२वी (PCM) मध्ये किमान ७०% गुण (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स)
  • १०वी किंवा १२वी इंग्रजी विषयात किमान ५०% गुण
  • JEE (Main) 2024 परीक्षेत सहभाग अनिवार्य
वयोमर्यादा:
  • उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2006 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान असावा.
शारीरिक मापदंड:
  • उंची: पुरुष – किमान 157 सेमी, महिला – किमान 152 सेमी
  • छाती (पुरुष): किमान ५ सेमी फुगविता येणे आवश्यक
  • दृष्टी:
    • Uncorrected: 6/6, 6/9
    • Corrected: 6/6, 6/6
निवड पद्धत:
  • JEE (Main) 2024 च्या All India Common Rank List (CRL) नुसार उमेदवारांना SSB इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • SSB इंटरव्ह्यू सप्टेंबर 2025 पासून बंगळूरु, भोपाल, कोलकाता, विशाखापट्टणम् येथे होणार.
  • स्टेज-1: Intelligence Test, Picture Perception, Group Discussion
  • स्टेज-2: Psychological Testing, Group Testing, Interview (4 दिवस)
  • वैद्यकीय तपासणी आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर निवड.
प्रशिक्षण आणि लाभ:
  • Applied Electronics & Communication, Mechanical, Electronics & Communication Engineering या शाखांमध्ये प्रशिक्षण
  • यशस्वी उमेदवारांना Jawaharlal Nehru University (JNU) मार्फत B.Tech पदवी
  • Sub Lieutenant पदावर नियुक्ती
  • दरमहा वेतन: ₹1,25,000/- (अंदाजे) + भत्ते
  • 1 कोटी रुपयांपर्यंत इन्शुरन्स संरक्षण
  • संपूर्ण ट्रेनिंग खर्च नौदलाकडून
  • खेळ व अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सची संधी
अर्ज प्रक्रिया:
  • अर्ज संकेतस्थळावर: www.joinindiannavy.gov.in
  • अर्जाची मुदत: ३० जून ते १४ जुलै २०२५
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे JPG/TIFF फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावीत:
    1. १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
    2. १०वी/१२वी गुणपत्रक
    3. JEE (Main) 2024 स्कोअर कार्ड
    4. पासपोर्ट साईज फोटो
महत्वाचे:
  • SSB इंटरव्ह्यूसाठी जाण्या-येण्यासाठी AC 3 Tier रेल्वे भाडे परतफेड (बँक पासबुक किंवा चेक झेरॉक्स आवश्यक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *