आगामी सण व उत्सवानिमित्त पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटलांची बैठक संपन्न !

Panvel Police Patil
पनवेल ( संजय कदम ) :
आगामी वटपोर्णिमा व बकरीईदसह इतर सण व उत्सवानिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयोजित बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर व गोपनिय विभागाचे अधिकारी कुवर यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना आगामी सण, उत्सव त्यामध्ये प्रामुख्याने बकरीईद, छत्रपती संभाजी महाराज जयंती, किल्ले रायगड शिवराज्याभिषेक (तिथीप्रमाणे) तसेच वटपौर्णिमा निमित्ताने गावात सर्व सण व उत्सव एकोप्याने व आनंदाने शांततेच्या मार्गाने साजरे व्हावे, याकरिता पोलीस पाटलांनी विशेष लक्ष घालावे. तसेच आपले रुम, ब्लॉक, गाळे भाड्याने देताना त्याची पूर्ण माहिती पोलीस ठाण्यात द्यावी. यासह इतर महत्वाच्या माहिती व सुचना पोलीस पाटलांना करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *