आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पनवेल शहर व पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील महामार्गालगत असलेल्या हॉटेल, ढाबा, चालक-मालक यांची बैठक सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली मंथन हॉल येथे घेण्यात आली.
या बैठकीला मार्गदर्शन करताना सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांनी सांगितले की, आगामी गणेश उत्सव दरम्यान कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणे वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. या करीता ढाबा, हॉटेल, दुकान समोरील रोडवर वाहन पार्किंग होणार नाही याची दक्षता घेणे, पार्किंग तसेच हॉटेल परिसरात चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, वाहने अस्ताव्यस्त पार्क होणार नाही याकरिता जास्तीत जास्त सुरक्षारक्षक नेमणे, वाहतूक नियमनाकरिता आवश्यक ती पोलिस प्रशासनास मदत करणे, पार्किंग नियोजनासाठी पीए सिस्टीमचा वापर करणे, कोणीही मद्य विक्री करणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांच्यासह 35 ते 40 हॉटेल, ढाबा चालक-मालक उपस्थित होते.